शहरात लवकरच वृक्षलागवड मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:08+5:302021-08-14T04:26:08+5:30
अहमदनगर : शहरासह उपनगरांत पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, शहरात लवकरच वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात ...

शहरात लवकरच वृक्षलागवड मोहीम
अहमदनगर : शहरासह उपनगरांत पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, शहरात लवकरच वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिली.
बुरुडगाव कचरा डेपो येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी बारस्कर बोलत होते. मनपाच्या बुरूडगाव कचरा डेपो येथे वृक्षरोपण करताना आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, उद्यानप्रमुख मेहेर लहारे, राधाकृष्ण कुलट, ओंकार देशमुख, शहर अभियंता सुरेश इथापे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीची बारस्कर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, शहरात महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थांनाही पत्र देण्यात आले आहे. महापालिकेच्या वृक्षलागवडीत सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असेही यावेळी बारस्कर म्हणाले. उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, अहमदनगर महानगरपालिकेचे बुरुडगाव येथील कचरा डेपो आहे. संपूर्ण शहराचा कचरा संकलन या ठिकाणी होत आहे. त्यावर प्रक्रिया केली जाते. हा भाग स्वच्छ सुंदर व हरित राहण्यासाठी येथे वृक्षांची अत्यंत गरज आहे. या दृष्टिकोनातून महापालिकेने पावले उचलली असून, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल, असे ते म्हणाले.
...
सूचना: फोटो १३ बारस्कर नावाने आहे.