कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई शिखरावरही पर्यटकांंना बंदी; बोरी ग्रामस्थांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 15:15 IST2020-03-16T15:14:48+5:302020-03-16T15:15:51+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई शिखरावरही पर्यटकांंना बंदी; बोरी ग्रामस्थांचा निर्णय
राजूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे. तसा सूचना फलकही गाव वेशीबाहेरील कोल्हार-घोटी रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आला आहे.
सध्या राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनामार्फत या संबंधात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले जात आहे. असे असतानाच राज्यातील सर्वात मोठे शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाई शिखरावर राज्यातून अनेक गियारोहक आणि पर्यटक येथे येत असतात. येणारे सर्व पर्यटक हे शहरी भागातून येत असतात. कोरोनाचे रुग्णही सध्या शहरी भागात आढळून येत आहेत. म्हणूनच खबरदारी म्हणून कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी तेथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने काही काळासाठी बंद ठेवले आहे. एव्हढेच नव्हे तर या नियमाचे उल्लंघन करणा-या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा उल्लेखही या फलकावर करण्यात आला आहे.