ग्रामीण भागातील दळणवळणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:16+5:302021-07-17T04:18:16+5:30
टाकळी ढोकेश्वर : देशासह राज्यात कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मोफत लसीकरणाच्या उद्दिष्टाने ३५ हजार कोटींचा विशेष ...

ग्रामीण भागातील दळणवळणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही
टाकळी ढोकेश्वर : देशासह राज्यात कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मोफत लसीकरणाच्या उद्दिष्टाने ३५ हजार कोटींचा विशेष तरतूद केली आहे. कोरोना काळात रस्त्याची कामे पूर्ण होण्याबाबत केंद्र सरकार कटिबद्ध असून, ग्रामीण भागांमध्ये दळणवळणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे, वसंत चेडे, अश्विनी थोरात, अमोल मैड, डॉ. भाऊसाहेब खिलारी, बबनराव झावरे, सुभाष दुधाडे, अरूण ठाणगे, डॉ. राजेंद्र भनगडे, संदीप थोरात, निवृत्ती वाळुंज, भगवान वाळुंज, बबन वाळुंज आदी उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील सुपा, बाबुर्डी, रांजणगाव मशीद, पाडळी रांजणगाव, वडनेर हवेली, कान्हूर पठार, पिंपळगाव तुर्क, तिखोल येथील गावांना भेट देऊन विविध विकासकामांचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते झाला.
विखे म्हणाले, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत पारनेर तालुक्यात पाच रस्ते सुचविले होते. पहिल्या टप्प्यात या आठ रस्त्यांना मंजुरी मिळाली याचा विशेष आनंद आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी पारनेर तालुक्यात सर्वांत जास्त निधी हा आमच्या तालुक्याला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा अनेक वेळा व्यक्त होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन पारनेर तालुक्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, असे त्यांनी सांगितले.
------
१६ टाकळी
पारनेर तालुक्यातील विकासकामांचा प्रारंभ करताना खासदार डॉ. सुजय विखे व इतर.