बालकांच्या हक्काबाबत प्रशिक्षण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:58+5:302021-03-21T04:20:58+5:30

अहमदनगर : शेवगाव व पाथर्डी येथे ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम, ...

Training workshop on child rights | बालकांच्या हक्काबाबत प्रशिक्षण कार्यशाळा

बालकांच्या हक्काबाबत प्रशिक्षण कार्यशाळा

अहमदनगर : शेवगाव व पाथर्डी येथे ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. पाटील, परिविक्षाधीन अधिकारी एस. ए. राशिनकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी शीतल खिडे, बालविकास प्रकल्प अधिकारी (शेवगाव) एस. एस. ढाकणे, महेंद्र दराडे, तालुका संरक्षण अधिकारी सचिन जाधव व गोवर्धन वीर यांच्या उपस्थितीत ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांना यावेळी बालकांच्या हक्कांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेत सचिन जाधव, सर्जेराव शिरसाठ, प्रकाश वाघ, बाळू साळवे, श्रद्धा मुसळे, रूपाली वाव्हळ तसेच सर्व पर्यवेक्षक यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रास्ताविकात श्रद्धा मुसळे यांनी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. या कार्यशाळेत बाल कामगारांना शिक्षण मिळण्यासाठी, बालविवाह व बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याची माहिती देण्यात आली. यावेळी चाईल्ड लाईन सदस्यांनी बालकांचे हक्क व संरक्षण विषयासंदर्भात मार्गदर्शन केले.

Web Title: Training workshop on child rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.