पिंपळगाव कौडा येथे महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:50+5:302021-01-04T04:18:50+5:30
यावेळी महिंद्रा कोटक बँकेच्या (मुंबई) सीएसआर माया पाटील, मराठवाडा ग्रामीण विकास केंद्राच्या श्रद्धा चव्हाण, टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे ...

पिंपळगाव कौडा येथे महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र
यावेळी महिंद्रा कोटक बँकेच्या (मुंबई) सीएसआर माया पाटील, मराठवाडा ग्रामीण विकास केंद्राच्या श्रद्धा चव्हाण, टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीएसआर विश्वास सोनावले, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डिअॅब्रिओ, सरपंच सतीश ढवळे, उपसरपंच छाया ढवळे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
यावेळी फादर जॉर्ज डिअॅब्रिओ म्हणाले महिलांचे सक्षमीकरण व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी रोशनी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना ब्युटीपार्लर, शिवणकाम, मसाला बनविणे, रजई बनविणे आदी घरगुती पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विश्वास सोनावले म्हणाले की, महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्दिष्टाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगून, त्यांनी टाटा पॉवरच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
माया पाटील यांनी शिक्षणाने महिला आत्मनिर्भर बनू शकतात. प्रशिक्षणातून महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. स्वत:चा विकास साधण्यासाठी महिलांनी कला, कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच ढवळे यांनी आभार मानले.
फोटो - ०३ प्रशिक्षण केंद्र
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव कौंडा येथे महिलांसाठी रोशनी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.