कोरोना जनजागृतीसाठी ३ लाख महिलांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:16+5:302021-08-21T04:25:16+5:30
या जनजागृती कार्यशाळेत जिल्ह्यातील ३ लाख महिलांना एका महिन्यात ॲानलाइन प्रशिक्षित करून कोरोनाविषयी असलेली भीती व उपाययोजना यासंदर्भात डाॅ. ...

कोरोना जनजागृतीसाठी ३ लाख महिलांना प्रशिक्षण
या जनजागृती कार्यशाळेत जिल्ह्यातील ३ लाख महिलांना एका महिन्यात ॲानलाइन प्रशिक्षित करून कोरोनाविषयी असलेली भीती व उपाययोजना यासंदर्भात डाॅ. बहुरूपी यांनी परिश्रम घेतले. महिनाभर चाललेल्या या कार्यशाळेत रोज २ ते ४ या वेळेत मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाची लागण झाली तर लहान बाळांची काळजी कशी घ्यावी, कोरोनापासून त्यांचा बचाव कसा करावा, मुलांना कसे वाढवावे, त्यांचा आहार कसा असावा, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर कसे ठेवावे, याविषयी डाॅ. बहुरूपी यांनी जागृती केल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी त्यांचे कौतुक केले.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांनीही महिलांशी संवाद साधत विशेष मार्गदर्शन केले.
-------------
फोटो - २०चेनता बहुरूपी