शिर्डीत वाहतूक नियम जनजागृती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:26 IST2021-08-20T04:26:18+5:302021-08-20T04:26:18+5:30

गुरुवारी सकाळी दहा वाजता येथील लक्ष्मीनगर चौक येथे रस्त्यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाहन चालकाने वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, ...

Traffic Rules Awareness Workshop in Shirdi | शिर्डीत वाहतूक नियम जनजागृती कार्यशाळा

शिर्डीत वाहतूक नियम जनजागृती कार्यशाळा

गुरुवारी सकाळी दहा वाजता येथील लक्ष्मीनगर चौक येथे रस्त्यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाहन चालकाने वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, वाहन चालवताना पाळावयाचे नियम याविषयी उपस्थितांनी जनजागृती केली. नियम मोडणाऱ्या चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे प्रबोधन करत वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता दिवाणी न्यायाधीश अदिती आर. नागोरी यांच्यासह सह दिवाणी न्यायाधीश डी. ए. डोईफोडे, सह दिवाणी न्यायाधीश सरिता विश्वंभर, राहाता वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनिल शेजवळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक विकास देवरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, उपनिरीक्षक बारकू जाणे, गंगलवाड, वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲड. वारुळे, ॲड. चित्रे, न्यायालय अधीक्षक लोहाटे, विधी सेवा समितीचे समन्वयक बळे उपस्थित होते.

Web Title: Traffic Rules Awareness Workshop in Shirdi