जैन ओसवालची परंपरा कौतुकास्पद
By | Updated: December 5, 2020 04:40 IST2020-12-05T04:40:09+5:302020-12-05T04:40:09+5:30
सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्या वतीने शासनाच्या आवश्यक परवानगीनुसार सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप सुरू करण्यात आले आहे. ...

जैन ओसवालची परंपरा कौतुकास्पद
सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्या वतीने शासनाच्या आवश्यक परवानगीनुसार सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी आहेर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जवाहर मुथा होते. कार्यक्रमाला चेअरमन ईश्वर बोरा, व्हाईस चेअरमन किरण शिंगी, संचालक समीर बोरा, संतोष गांधी, शांतीलाल गुगळे, सुवर्णा डागा, अभय पितळे, पंडितराव खरपुडे, शैलेश गांधी, विनय भांड, सी. ए. विशाल गांधी, सी. ए. संकेत पोखरणा, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भंडारी, मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी मनोज लुनिया आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सभासद धनेश गांधी, हितेश गुप्ता, रितेश कोठारी, नितीन मुनोत, डॉ. पृथ्वीराज मुनोत यांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. (वा.प्र.)
-------
फोटो - ०४ जैन ओस्तवाल