टाकळी ढोकेश्वरमध्ये सत्तांतराची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:19 IST2021-01-21T04:19:27+5:302021-01-21T04:19:27+5:30

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी गेल्या पंधरा वर्षांपासूनचा सत्तांतराची परंपरा कायम ठेवली. आमदार नीलेश ...

The tradition of independence continues in Takli Dhokeshwar | टाकळी ढोकेश्वरमध्ये सत्तांतराची परंपरा कायम

टाकळी ढोकेश्वरमध्ये सत्तांतराची परंपरा कायम

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी गेल्या पंधरा वर्षांपासूनचा सत्तांतराची परंपरा कायम ठेवली.

आमदार नीलेश लंके, ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी यांच्या गटाला मतदारांनी कौल दिला. त्यांच्या ढोकेश्वर ग्रामविकास पॅनेलला १० जागा मिळाल्या असून, जनसेवा पॅनेलला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी जनसेवा पॅनेलला १०, तर ढोकेश्वर ग्रामविकास पॅनेलला पाच जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीतील विजयी उमेदवार असे : प्रभाग क्र. १ - दत्ता निवडुंगे, सुनीता जयसिंग झावरे, गंगाधर निवडुंगे. प्रभाग २ - शिवाजी सीताराम खिलारी, पूजा नवीन झावरे, अर्चना बापूसाहेब रांधवन. प्रभाग ३ - सुनील हरिभाऊ चव्हाण, प्रियंका सोमनाथ बांड, किशोर शिवाजी गायकवाड. प्रभाग ४ - अरुणा प्रदीप खिलारी, रामा किसन तराळ, शुभम सुनील गोरडे. प्रभाग ५ - सुमन दीपक साळवे, कमल भाऊसाहेब खिलारी, सुग्राबी कादर हवलदार.

फोटो ओळी : २० टाकळी ढोकेश्वर

टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामविकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: The tradition of independence continues in Takli Dhokeshwar