कपाशीच्या पल्हाट्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:25+5:302021-04-19T04:18:25+5:30

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बोधेगाव कृषी मंडळात यंदा १४ हजार ४४७ हेक्टरवर कपाशी लागवड ...

Tractor support for farmers to remove cotton stalks | कपाशीच्या पल्हाट्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा आधार

कपाशीच्या पल्हाट्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा आधार

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बोधेगाव कृषी मंडळात यंदा १४ हजार ४४७ हेक्टरवर कपाशी लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे यावर्षी कपाशीच्या उत्पादनात घट झाली. हिवाळ्यात रबी पिकांसाठी काहींनी कपाशी उपटून रान मोकळे केले. तर बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी पिके जैसे-थे ठेवली होती. जमिनीतील ओलाव्यामुळे कपाशीला नव्याने बोंडे फुटली. यापासून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी कापूस हाती लागला. सध्या मान्सूनपूर्व मशागतीसाठी शेतकरी रान मोकळे करत आहेत. मजूर टंचाई तसेच हाताने कपाशी, तूर उपटून काढणे जिकिरीचे असल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कपाशीच्या पल्हाट्या व तुराट्या काढून घेत आहेत. ट्रॅक्टरच्या साहाय्याने एक एकर कपाशी काढण्यासाठी साधारणपणे ८०० रुपये तर तुरीसाठी १ हजार २०० रुपये खर्च येतो. ट्रॅक्टरने कमी वेळेत झटपट कामे उरकत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देत असल्याचे दिसते. मात्र, सध्याच्या इंधन दरवाढीमुळे मशागतीच्या कामांचा खर्च वाढल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

...............

ट्रॅक्टरला जोडलेल्या व्ही पासच्या मदतीने कपाशीच्या पल्हाट्या व तुरी निघतात. या कामासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी असते. सध्या डिझेलचे दर वाढल्याने मशागतीच्या भावातही वाढ करावी लागली आहे.

- गोवर्धन ढेसले, ट्रॅक्टर चालक-मालक बोधेगाव.

...........

कपाशी, तूरी उपटून काढणे हे खूपच जिकिरीचे काम आहे. त्यासाठी मजूरही मिळत नाहीत. यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने कामे उरकून घेतली आहेत.

-ज्ञानदेव घोरतळे, शेतकरी बोधेगाव.

...........

फोटो - १८ बोधेगाव

बोधेगाव येथील मारोती वस्तीनजीक शेतातील कपाशी, तूर ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढताना ट्रॅक्टरचालक गोवर्धन ढेसले.

Web Title: Tractor support for farmers to remove cotton stalks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.