पोलिस पथकाच्या ताब्यातील ट्रक्टर पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:48 IST2018-08-04T15:42:02+5:302018-08-04T15:48:44+5:30
प्रवरा नदीपात्रात वाळूने भरलेला ट्रक्टर राहुरी पोलिसानी चिंचोली परिसरात पकडला, मात्र वाळू तस्करांनी पोलिसांच्या ताब्यातून ट्रक्टर पळवून हातावर तु-या दिल्याची घटना काल घडली. यासंदर्भात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस पथकाच्या ताब्यातील ट्रक्टर पळविला
राहुरी : प्रवरा नदीपात्रात वाळूने भरलेला ट्रक्टर राहुरी पोलिसानी चिंचोली परिसरात पकडला, मात्र वाळू तस्करांनी पोलिसांच्या ताब्यातून ट्रक्टर पळवून हातावर तु-या दिल्याची घटना काल घडली. यासंदर्भात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द लगत असलेल्या प्रवरा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहीती राहुरी पोलिसांनी समजली. त्यानंतर राहुरी पोलिसांनी चिंचोली परिसरातून वाळूचा ट्रक्टर चालविला होता. आरोपी दिपक लाटे याने पोलिसांच्या ताब्यातून ट्रक्टर घेत पलायन केले. यासंदर्भात पोलिस किशोर हिंगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यापुर्वीही पोलिसांच्या ताब्यातून वाळूची वहाने पळवून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.