५० फुटावरुन ट्रॅक्टर कोसळला घरावर; चालक ठार

By Admin | Updated: May 11, 2017 16:20 IST2017-05-11T16:20:21+5:302017-05-11T16:20:21+5:30

अगस्ती सेतू पुलावरुन सुमारे पन्नास फूट खोल असलेल्या एका घरावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळल्याची गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली़

Tractor collapses 50 feet; The driver killed | ५० फुटावरुन ट्रॅक्टर कोसळला घरावर; चालक ठार

५० फुटावरुन ट्रॅक्टर कोसळला घरावर; चालक ठार

आॅनलाइन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ ११ - शहरातील अगस्ती सेतू पुलावरुन सुमारे पन्नास फूट खोल असलेल्या एका घरावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळल्याची गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली़ या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला़
टाकळी येथील शिवाजी घोलप यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने रात्री माती वाहतुकीचे काम सुरु होते. कमानवेस भागातील गढीकडून अगस्ती सेतू पुलाकडे जाताना तीव्र उताराचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला असलेला सिमेंट काँक्रीटचा कठडा तोडून ट्रक्टर (क्र.एम.एम.१७ जी-६४४) व मातीने भरलेली ट्रॉली सुमारे ५० फूट खोल असलेल्या घरावर कोसळले. यात ट्रॅक्टर, ट्रॉलीचा चक्काचूर झाला असून ट्रक्टर चालक रविंद्र भाऊसाहेब पुंडे (वय ३०, रा.ढोकरी) हा युवक जागीच ठार झाला आहे. या अपघातामुळे घराच्या भिंतीस मोठे भगदाड पडले असून त्यातील लाकडी फर्निचरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घरात कुणीही नव्हते. अपघाताच्या आवाजाने रामनाथ भालेराव यांच्या बंगल्यातील सर्व सदस्य, कुंभारआळा व विट भट्टी परिसरातील नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. मातीच्या ठिगाऱ्यातून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ग्रामिण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर ढोकरी येथे गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Tractor collapses 50 feet; The driver killed