शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर ट्रॅक्टर-पिकअपचा अपघात, एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 11:33 IST

अपघातात तीन जण जखमी, ट्रॅक्टरचे दोन तुकडे

रामप्रसाद चांदघोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव (संगमनेर): पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी ( दि.१३) नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवरात घडला. यात रस्त्याने पायी जाणारे  तीन शाळकरी मुलेही जखमी झाले आहेत.

संतोष नारायण शिंदे (वय-४२ रा. उंब्रज नंबर १,ता.जुन्नर, जि.पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  संतोष शिंदे हे ट्रॅक्टर घेऊन आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. गुरूवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात आले असता त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक शिंदे हे जागीच ठार झाले. दरम्यान, संबंधित ठिकाणाहून पायी जाणार्‍या तीन शाळकरी मुलांनाही धडक बसली. यात डोळासणे परिसरातील अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे, राणी लहु लोहकरे हे तिघेही जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी  अपघातस्थळी धाव घेतली. खासगी रुग्णवाहिकेतून जखमी मुलांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पोलीस हवालदार पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. टोलनाक्याचे कर्मचारीही क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रॅक्टर महामार्गावरून बाजूला काढण्यात आला. दरम्यान, पिकअप चालक फरार झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातDeathमृत्यू