शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक वे हॉलिडे’कडून पर्यटकांची फसवणूक

By admin | Updated: December 15, 2015 23:16 IST

अहमदनगर : नगरच्या आनंद वर्ल्ड टूर्स प्रा. लि. व आयसीआयसीआय बँकेमार्फत पर्यटकांचे ४८ लाख रुपये घेऊन मुंबई येथील मेक वे हॉलिडे या कंपनीने सहली रद्द केल्या.

अहमदनगर : नगरच्या आनंद वर्ल्ड टूर्स प्रा. लि. व आयसीआयसीआय बँकेमार्फत पर्यटकांचे ४८ लाख रुपये घेऊन मुंबई येथील मेक वे हॉलिडे या कंपनीने सहली रद्द केल्या. या प्रकरणी फसवणूक झाल्याने आनंद टूर्सच्या व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीवरून हॉलिडे कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद टूर्स प्रा. लि. (मार्केट यार्ड) कंपनीच्या नगरच्या व्यवस्थापक सरिता शेषराव साबळे (रा. बुरुडगाव रोड, माणिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हॉलिडे कंपनीचे संचालक झेनी विजयभानसिंग उर्फ सोनाली डिलिल्व्हा वसदर आणि विजयभानसिंग रामेश्वर सिंग (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे की, मार्च-२०१५ ते मे २०१५ या कालावधीत हॉलिडे कंपनीने पर्यटकांचे पैसे आयसीआयसीआय बँकेमार्फत थेट खात्यावर जमा करून घेतले. तसेच काही पैसे नगर येथील आनंद टूर्स प्रा. लि., (मार्केट यार्ड) यांच्यामार्फत जमा करून घेतले. कंपनीने पर्यटकांचे ४८ लाख १० हजार रुपये ड्रीम हॉलिडेमार्फत जमा करून घेतले. पैसे जमा करून नियोजित तारखांच्या सहली विनाकारण रद्द केल्या. पैसे घेतल्यानंतर बनावट पीएनआर नंबर पाठवून तिकिट आरक्षित केल्याचे भासविले. नमूद रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी भादंवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)