‘मेक वे हॉलिडे’कडून पर्यटकांची फसवणूक
By Admin | Updated: December 15, 2015 23:16 IST2015-12-15T23:06:56+5:302015-12-15T23:16:29+5:30
अहमदनगर : नगरच्या आनंद वर्ल्ड टूर्स प्रा. लि. व आयसीआयसीआय बँकेमार्फत पर्यटकांचे ४८ लाख रुपये घेऊन मुंबई येथील मेक वे हॉलिडे या कंपनीने सहली रद्द केल्या.

‘मेक वे हॉलिडे’कडून पर्यटकांची फसवणूक
अहमदनगर : नगरच्या आनंद वर्ल्ड टूर्स प्रा. लि. व आयसीआयसीआय बँकेमार्फत पर्यटकांचे ४८ लाख रुपये घेऊन मुंबई येथील मेक वे हॉलिडे या कंपनीने सहली रद्द केल्या. या प्रकरणी फसवणूक झाल्याने आनंद टूर्सच्या व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीवरून हॉलिडे कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद टूर्स प्रा. लि. (मार्केट यार्ड) कंपनीच्या नगरच्या व्यवस्थापक सरिता शेषराव साबळे (रा. बुरुडगाव रोड, माणिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हॉलिडे कंपनीचे संचालक झेनी विजयभानसिंग उर्फ सोनाली डिलिल्व्हा वसदर आणि विजयभानसिंग रामेश्वर सिंग (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे की, मार्च-२०१५ ते मे २०१५ या कालावधीत हॉलिडे कंपनीने पर्यटकांचे पैसे आयसीआयसीआय बँकेमार्फत थेट खात्यावर जमा करून घेतले. तसेच काही पैसे नगर येथील आनंद टूर्स प्रा. लि., (मार्केट यार्ड) यांच्यामार्फत जमा करून घेतले. कंपनीने पर्यटकांचे ४८ लाख १० हजार रुपये ड्रीम हॉलिडेमार्फत जमा करून घेतले. पैसे जमा करून नियोजित तारखांच्या सहली विनाकारण रद्द केल्या. पैसे घेतल्यानंतर बनावट पीएनआर नंबर पाठवून तिकिट आरक्षित केल्याचे भासविले. नमूद रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी भादंवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)