माहेराहून दहा लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST2021-03-28T04:19:29+5:302021-03-28T04:19:29+5:30

जामखेड : फळे पिकविण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेराहून दहा लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ ...

Torture of a married woman to bring ten lakh rupees from Mahera | माहेराहून दहा लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

माहेराहून दहा लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जामखेड : फळे पिकविण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेराहून दहा लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासऱ्यासह आठ जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत विवाहितीने फिर्याद दिली आहे. विवाहिता नगर येथील माळीवाडा येथील पंचपीर चावडी भागात सासरी नांदत होती. तिचे माहेर जामखेड येथील कुंभारतळ येथे आहे. पती जावेद मोहम्मद हुसेन बागवान, सासू रशिदा महंमद हुसेन, सासरे महंमद हुसेन हसन बागवान, नणंद नाजिया पीरमहंमद, भाया साजीद महंमद हुसेन बागवान, जाऊबाई रूकैय्या साजिद बागवान व दीर समीर महंमद हुसेन बागवान (सर्व रा. माळीवाडा, पंचपीर चावडी, नगर) यांनी विवाहितेचा घर बांधणीसाठी माहेराहून दोन लाख रूपये, फळ पिकविण्याचा नवीन एसी खरेदीसाठी दहा लाख रूपये आणावेत, अशी मागणी करत शारीरिक, मानसिक छळ केला. पैसे घेऊन ये अन्यथा येथे राहायचे नाही, असे म्हणत विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्लास्टिकच्या खुर्चीने डोक्यात मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोस करत आहेत.

Web Title: Torture of a married woman to bring ten lakh rupees from Mahera