निवडणुकीवरुन दोन गटात तुफान हाणामारी

By Admin | Updated: August 31, 2016 00:31 IST2016-08-31T00:22:26+5:302016-08-31T00:31:29+5:30

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटात सोमवारी तुफान हाणामारी झाली.

Tornado fight in two groups from election | निवडणुकीवरुन दोन गटात तुफान हाणामारी

निवडणुकीवरुन दोन गटात तुफान हाणामारी


नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटात सोमवारी तुफान हाणामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. सोनई पोलिसांनी याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या.
आमच्या विरोधात सोसायटीच्या निवडणुकीत का? उभे राहिलात, असे म्हणून प्रमोद भगवान तांदळे यांच्यासह त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये प्रमोद तांदळे यांचे वडील गंभीर जखमी झाले. याबाबत प्रमोद तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेशवाडीच्या सरपंच राधाबाई कृष्णा तांदळे, दत्तात्रय वासूदेव तांदळे, योगेश दत्तात्रय तांदळे, सुमनबाई दत्तात्रय तांदळे, कृष्णा वासूदेव तांदळे, मदन कृष्णा तांदळे, सागर कृष्णा तांदळे, यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. दुसरी फिर्याद योगेश दत्तात्रय तांदळे (वय २६ रा.गणेशवाडी ता.नेवासा) यांनी दिली. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, सोसायटी निवडणुकीत तुमच्या भावकीमुळे आम्ही पडलो आहोत, असे म्हणून शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. तसेच भगवान तांदळे याने मला कट्टा दाखवून तुला व तुझ्या चुलत्याला जीवे ठार मारील, अशी धमकी दिली. योगेश तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी भगवान विष्णू तांदळे, प्रमोद भगवान तांदळे, राजेंद्र विश्वनाथ तांदळे, दीपक राजेंद्र तांदळे, सुनील बाबासाहेब तांदळे, पवन बाबासाहेब तांदळे, प्रसाद कैलास दहिफळे व रुख्मिनी भगवान तांदळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Tornado fight in two groups from election