टोमॅटो पिकाची नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:59+5:302021-05-27T04:21:59+5:30

माळीझाप शेतकरी मंडलिक यांनी सुगाव येथील माउली सिडलिंग नर्सरीतून आयुष्यमान जातीचे ९५०० रोपे विकत घेतली. एक एकर लागवड करून ...

Tomato crop should be compensated | टोमॅटो पिकाची नुकसान भरपाई मिळावी

टोमॅटो पिकाची नुकसान भरपाई मिळावी

माळीझाप शेतकरी मंडलिक यांनी सुगाव येथील माउली सिडलिंग नर्सरीतून आयुष्यमान जातीचे ९५०० रोपे विकत घेतली. एक एकर लागवड करून लाखभर रुपये खर्च केला. आता टोमॅटो फळावर लाल, पिवळे डाग दिसत आहेत. टोमॅटो कापल्यावर आतुन पांढरे चट्टे दिसतात. मार्केटमध्ये या मालाला कुणी विचारत नाही. पर्यायाने टोमॅटो तोडणी खर्च करून बांधावर फेकून द्यावे लागत आहे. निकृष्ठ दर्जाचे फळे निपजतात म्हणून मंडलिक यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

या टोमॅटो पिकाची तत्काळ पाहणी करण्यासाठी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेन्द्रे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी यांनी टोमॅटो पिकाची पाहणी करून फळासहीत टोमॅटोचे झाड हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. मागील वर्षीदेखिल काही शेतकऱ्यांनी अशा तक्रारी केल्या होत्या. हवामान बदलामुळे कुकुंबर फन्गस अशा आठ प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा पिकांवर प्रादुर्भाव होतो आणि डाग असलेले फळे लागतात, असे गतवर्षी निष्पन्न झाले होते, असे शेतकरी महेश नवले यांनी सांगितले.

अधिकारी यांनी माळीझाप येथील टोमॅटो शेतीची पहाणी केली. यावेळी ग्राहक पंचायतचे महेश नवले, दत्ता शेणकर, सुरेश नवले, स्वप्निल नवले, भाऊसाहेब वाळुंज, बाळासाहेब मंडलिक, भारत मंडलिक उपस्थित होते.

...........

फोटो आहे

Web Title: Tomato crop should be compensated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.