आज होणार पलंग-पालखी भेट

By Admin | Updated: September 27, 2014 00:15 IST2014-09-27T00:03:37+5:302014-09-27T00:15:01+5:30

भिंगार : हजारो वर्षांची परंपरा लाभलेला पलंग-पालखी भेट सोहळा शनिवारी (दि़२७) बुऱ्हाणनगर येथे रंगणार आहे़

Today will be a visit to the couch | आज होणार पलंग-पालखी भेट

आज होणार पलंग-पालखी भेट

भिंगार : हजारो वर्षांची परंपरा लाभलेला पलंग-पालखी भेट सोहळा शनिवारी (दि़२७) बुऱ्हाणनगर येथे रंगणार आहे़ हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातील भाविक बुऱ्हाणनगरला येतात़
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे बुऱ्हाणनगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर मानले जाते़ नवरात्र उत्सव काळात तुळजापुरात दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मूर्तीला नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन केले जाते़ तर पलंगावर पाच दिवस निद्रीस्त अवस्थेत ठेवले जाते़ हा पलंग जुन्नर येथे गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पलंग बनविला जातो़ पूर्वी हिंगणगाव (ता़नगर) येथे दरवर्षी नवीन पालखी तयार केली जात होती़ मात्र, आता ही पालखी राहुरीमध्ये बनविली जात आहे़ पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखीसाठी लागणारे साहित्य बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अर्जुन भगत पुरवितात़
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी राहुरीतून तर पलंग जुन्नरहून नगरकडे मार्गस्थ होतात़ ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते़ नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप व तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर येथे यात्रेनिमित्त दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीची मिरवणूक काढली जाते़ मिरवणुकीनंतर ही पालखी हनुमान मंदिराच्या ओट्यावर विसावते़
दरम्यान त्याचवेळेस पलंगही तेथे पोहोचतो़ यावेळी हळदी कुंकू वाहून गुलालाची उधळण करीत तुळजाभवानी मातेचा जयजयकार केला जातो़ पूजा-आरती झाल्यानंतर पलंग व पालखी वेगवेगळ्या मागार्ने तुळजापूरकडे रवाना होतात़ पलंग-पालखी भेट सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक बुऱ्हाणनगरला येतात़ (वार्ताहर)

Web Title: Today will be a visit to the couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.