आजपासून कुकडीचे आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:23 IST2019-04-06T12:23:11+5:302019-04-06T12:23:25+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडण्याचा निर्णय घेतला.

आजपासून कुकडीचे आवर्तन
श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येडगाव धरणातून कुकडीचे आवर्तन आज गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाच तालुक्यातील 200 गावांची तहाण भागणार आहे.
येडगाव धरणात सध्या अर्धा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आह. पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी सोडले तर येडगाव धरणातून खाली साडेतीन टीएमसी सोडणे शक्य होणार आहे. कुकडीचे आवर्तन टेल टु हेड पध्दतीने करण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सुरुवातीला काही तास विसापूर तलावात पाणी सोडावे लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ७२ तलावात पाणी सोडण्याबाबत आम्ही जलसंपदा विभागास सूचना आहेत. श्रीगोंदा शहरातील लेंडीनाला, दत्तवाडी, मखरेवाडी, कापसे मळा, औटीवाडी तलावाचा समावेश आहे. अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली.