आज अखेरचा दिवस

By Admin | Updated: September 27, 2014 00:14 IST2014-09-27T00:00:32+5:302014-09-27T00:14:31+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शनिवारी अखेरचा दिवस आहे़

Today is the last day | आज अखेरचा दिवस

आज अखेरचा दिवस

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शनिवारी अखेरचा दिवस आहे़ मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच अर्ज दाखल करत प्रमुख नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत़ मात्र काहींना उशिराने आदेश मिळाल्याने त्यांच्याकडून अखेरच्या दिवशी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे़
आघाडी व युती तुटल्याने चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला़ त्यामुळे इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला़ मात्र या सर्व घोळात अर्ज दाखल करण्यास कमालीचा विलंब झाला़ मुदत संपण्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी शहरासह जिल्ह्यातील ८५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ दोन्ही मंत्र्यांसह पालकमंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी गुरुवारी अर्ज दाखल केले़ मात्र काहींना उशिराने आदेश मिळाल्यामुळे त्यांची चांगलीच धावपळ उडाली असून, त्यांनी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Today is the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.