शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या त्रासाला कंटाळून भावाची आत्महत्या

By शेखर पानसरे | Updated: April 18, 2023 19:20 IST

भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

संगमनेर (अहमदनगर) : भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.१७) दुपारी २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील रहिमपूर येथील ही घटना आहे. ज्ञानदेव देवराम जोर्वेकर (वय ५० वर्षे, रा. जुने रहिमपूर ता. संगमनेर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुकाराम देवराम जोर्वेकर (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मयत ज्ञानदेव जोर्वेकर यांच्या पत्नी अनिता उर्फ अन्नपूर्णा ज्ञानदेव जोर्वेकर (रा. जोर्वेकर वीटभट्टी, जुने रहिमपूर ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटण्यात तुकाराम जोर्वेकर याने घरामध्ये हिस्सा, शेती अवजारे अशा कोणत्याच वस्तू दिल्या नाहीत. तसेच मयत ज्ञानदेव जोर्वेकर यांना व त्यांच्या मुलाला वर्षभरापूर्वी शेतात शिवीगाळ करत मारहाण केली होती. अनिता उर्फ अन्नपूर्णा जोर्वेकर याचे नावावर असलेल्या जमिनीवर कर्ज काढले, ती जमीन व शेततळ्याचे पाणी देत नसल्याने त्यांचे पती ज्ञानदेव जोर्वेकर हे नेहमी विचारात, चिंतेत असायचे. तुकाराम जोर्वेकर याने अनिता उर्फ अन्नपूर्णा ज्ञानदेव जोर्वेकर यांच्या शेतात घास टाकला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ज्ञानदेव जोर्वेकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू