दशमीगव्हाण येथे शाळेसह मिनी अंगणवाडीला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 16:46 IST2017-08-30T16:41:34+5:302017-08-30T16:46:39+5:30

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था पाहून सरपंच अलका काळे, उपसरपंच बाबासाहेब काळे ...

Tigers of mini-Aanganwadi with a school at Dashmigawahan | दशमीगव्हाण येथे शाळेसह मिनी अंगणवाडीला टाळे

दशमीगव्हाण येथे शाळेसह मिनी अंगणवाडीला टाळे

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था पाहून सरपंच अलका काळे, उपसरपंच बाबासाहेब काळे यांनी या जिल्हा परिषद शाळेसह मिनी अंगणवाडीला टाळे ठोकले़
निंबोडी घटनेच्या पार्श्वभूमीवर दशमीगव्हाणचे उपसरपंच काळे यांनी गावातील प्राथमिक शाळेची पाहणी केली़ या शाळेच्या इमारत खोल्या मोडकळीस आल्या असून, धोकादायक बनल्या आहेत़ त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले़ यावेळी त्यांच्यासमवेत गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ काळे म्हणाले, शाळेला टाळे ठोकल्यावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे़ यास संबंधित विभाग जबाबदार आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाने शाळेंचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे़ याप्रसंगी विजय काळे, जयसिंग काळे, सोन्याबापू काळे, शाम बाबर, संजय कांबळे, अनिता काळे, अनिता बाबर, राम कवार, वैजयंता चेमटे, चंद्रकला काळे, भारती काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते़

Web Title: Tigers of mini-Aanganwadi with a school at Dashmigawahan