टायगर अभी जिंदा है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:31+5:302021-09-05T04:25:31+5:30

देवदैठण, पेडगाव, शेडगाव, अजनुज, कोळगाव परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांनी केला. त्यावेळी बबनराव पाचपुते बोलत होते. ...

Tiger is still alive | टायगर अभी जिंदा है

टायगर अभी जिंदा है

देवदैठण, पेडगाव, शेडगाव, अजनुज, कोळगाव परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांनी केला. त्यावेळी बबनराव पाचपुते बोलत होते. पाचपुते म्हणाले, कोरोनामुळे निधी मिळण्यास अडचणी होत्या. पण अनुभवाचा फायदा घेत निधी आणला आहे. त्यामुळे विकासाचे नवे पर्व जोरात सुरू झाले आहे. पण काहींचा विकास कामात अडथळा आणण्यात हातखंडा आहे. सन २०२४ ची निवडणूक ही सर्वांसाठी नवी संधी राहणार आहे. ज्यांना मैदानात उतरायचे त्यांनी उतरावे. पण सेटलमेंट करण्याचा धंदा कोणी करू नये. जर कोणी सेटलमेंट केली तर ते जनतेच्या दरबारात उघडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा चिमटा पाचपुतेंनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पंचशील गिरमकर, दिनकर पंधरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, उपसभापती मनीषा कोठारे, नानासाहेब ससाणे, जिजाबापू शिंदे, विश्वास गुंजाळ, देवराव वाकडे आदी उपस्थित होते.

Web Title: Tiger is still alive