गुरुवारी २७१ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST2021-03-05T04:21:49+5:302021-03-05T04:21:49+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी २७१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर २७८ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. ...

गुरुवारी २७१ कोरोनाबाधित
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी २७१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर २७८ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढत असून, सध्या १२८० जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०६ आणि अँटिजेन चाचणीत २१ रुग्णबाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (८७), अकोले (९), कर्जत (२), कोपरगाव (१०), नगर ग्रामीण (२१), नेवासा (९), पारनेर (१२), पाथर्डी (३१), राहाता (१५), शेवगाव (१६), मिलिटरी हॉस्पिटल (१) आणि इतर जिल्हा (११), राहुरी (३), संगमनेर (२८), श्रीगोंदा (६), श्रीरामपूर (९), कन्टोंन्मेंट (१) अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
------------------
बरे झालेली रुग्णसंख्या : ७४,३७८
उपचार सुरू असलेले रुग्ण : १,२८०
मृत्यू : ११४९
एकूण रुग्णसंख्या : ७६,८०७