पोलिसांच्या वाहनाला ट्रॅव्हलसची धडक : एमआयडीसीचे तीन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:08 IST2019-04-04T10:57:40+5:302019-04-04T11:08:52+5:30
नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल शिवारात वांबोरी फाटा येथे खासगी ट्रॅव्हलने पोलिसांच्या वाहनाला जोराची धडक दिली.

पोलिसांच्या वाहनाला ट्रॅव्हलसची धडक : एमआयडीसीचे तीन पोलीस जखमी
अहमदनगर : नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल शिवारात वांबोरी फाटा येथे खासगी ट्रॅव्हलने पोलिसांच्या वाहनाला जोराची धडक दिली. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एकूण तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, सहायक फौजदार दिनकर घोरपडे, पोलीस हवालदार दीपक गागंर्डे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. सहाय्यक फौजदार घोरपडे यांच्या फियार्दीवरून ट्रॅव्हल क्रमांक - एमएच -२७, पी-3366 चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांची गस्तीवरील सरकारी वाहनाने वांबोरी फाटा येथे टर्न घेतला. याचवेळी औरंगाबादकडून नगरकडे भरधाव वेगात येणा-या खासगी ट्रॅव्हलने जीपला जोराची धडक दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सहारे हे करीत आहेत.