तीन मजली जुनी इमारत कोसळली

By Admin | Updated: October 18, 2016 00:19 IST2016-10-18T00:17:50+5:302016-10-18T00:19:32+5:30

अहमदनगर : शहरातील सर्जेपुरा येथील लोणार गल्ली चौकातील ८० वर्षांपूर्वी बांधलेली तीन मजली इमारत सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक कोसळली़

Three-storey old building collapsed | तीन मजली जुनी इमारत कोसळली

तीन मजली जुनी इमारत कोसळली

अहमदनगर : शहरातील सर्जेपुरा येथील लोणार गल्ली चौकातील ८० वर्षांपूर्वी बांधलेली तीन मजली इमारत सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक कोसळली़ या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही़ या इमारतीचा पुढील भागही अतिशय खराब अवस्थेत असूनही तो कधीही कोसळू शकतो़
लोणार गल्ली चौकात १९३५ साली बांधलेली तीन मजली मनोहर नावाची मोठी इमारत आहे़ विटा, माती, लाकडे आणि कौलांचा यासाठी वापर करण्यात आलेला आहे़ मध्यंतरी झालेल्या सलग पावसामुळे या इमारतीत पाणी पाझरले होते़ हे बांधकाम ८० वर्षांपूर्वीचे झाल्याने धोकादायक बनले आहे़ काही वर्षांपूर्वी त्रिंबक दुरळे यांनी ही इमारत विकत घेतली होती़ गेल्या १५ वर्षांपासून या इमारतीत कुणीही राहत नाही़
दरम्यान पालिकेने ही इमारत धोकादायक असल्याची एक वर्षांपूर्वीच मालकाला नोटीस बजावली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले़
सोमवारी सकाळी ११ वाजता इमारतीच्या पाठीमागचे तिनही मजले कोसळले़ यावेळी इमारतीशेजारी कुणी नसल्याने जीवित हानी टळली़ अन्यथा मोठा अनर्थ झाला असता़ इमारत कोसळल्यानंतर तातडीने अग्नीशमन बंबास पाचारण करण्यात आले़ तसेच पालिकेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले़ (प्रतिनिधी)

Web Title: Three-storey old building collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.