संगमनेरात तीन दुकाने फोडली, ७० हजारांचा मुद्देमाल चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 20:36 IST2018-04-26T20:36:14+5:302018-04-26T20:36:21+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चोरी झालेल्या दुकानांपैकी सत्यप्रभा मेटल या भांड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.

संगमनेरात तीन दुकाने फोडली, ७० हजारांचा मुद्देमाल चोरीस
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चोरी झालेल्या दुकानांपैकी सत्यप्रभा मेटल या भांड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.
नितीन प्रभाकर गुजर यांनी दिलेल्या फिर्यादिवरून चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुंकलात अनेक गाळे आहेत. त्यातील नितीन गुजर यांचे सत्यप्रभा मेटल, रवि ढेरंगे यांचे साईकृपा इलेक्ट्रीकल्स व राजेश राहाणे यांच्या किसान हार्डवेअर या तीन दुकानांमध्ये चोरी झाली. ही तिन्ही दुकाने दोन मजली असून चोरट्यांनी सत्यप्रभा मेटल या दुकानास लागूनच असलेल्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. शेजारीच असलेल्या या दुकानांच्या शटरचे कु लूप चोरट्यांनी लोखंडी हत्याराने तोडले. सत्यप्रभा मेटल या दुकानातील ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. सत्यप्रभा मेटल या भांड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक बी. बी. देशमुख करीत आहेत.