दोन दुचाकीचे अपघातात, तीन गंभीर जखमी; भर पावसात रस्त्यावर उतरून मंत्री बोर्डीकर यांनी केली मदत
By सुदाम देशमुख | Updated: May 25, 2025 23:04 IST2025-05-25T23:03:49+5:302025-05-25T23:04:37+5:30
या मार्गावरून प्रवास करत असलेल्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रसंगावधान राखत भर पावसात रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला.

दोन दुचाकीचे अपघातात, तीन गंभीर जखमी; भर पावसात रस्त्यावर उतरून मंत्री बोर्डीकर यांनी केली मदत
शेवगाव (अहिल्यानगर): शेवगाव-पाथर्डी महामार्गावर दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. अपघात रविवारी सायंकाळी घडला.
या मार्गावरून प्रवास करत असलेल्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रसंगावधान राखत भर पावसात रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी अपघातस्थळी थांबत जखमींची विचारपूस केली व त्यांनी आपल्या ताफ्यातील गाडी जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी दिली. जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार होतील यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.