तीन दरोडेखोरांना काष्टीत पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 18:44 IST2017-08-29T18:44:42+5:302017-08-29T18:44:42+5:30

काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात चोरी अथवा रस्तालूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या पाचपैकी तीन दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एअरगन, कोयता व मिरची पूड जप्त करण्यात आली. दोघेजण फरार झाले. शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Three robbers caught in a scarf | तीन दरोडेखोरांना काष्टीत पकडले

तीन दरोडेखोरांना काष्टीत पकडले

ष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात चोरी अथवा रस्तालूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या पाचपैकी तीन दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एअरगन, कोयता व मिरची पूड जप्त करण्यात आली. दोघेजण फरार झाले. शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटकेमध्ये गणेश भाऊसाहेब संगपाळ, योगेश भाऊसाहेब संगपाळ व स्वप्नील अंकुश संगपाळ (रा. आंबळे, ता. शिरूर) यांचा समावेश आहे. परमेश्वर बालाजी केंद्रे (रा. काष्टी) यांची मोटारसायकल काष्टी येथील कोळी गल्लीतून चोरीस गेली होती. केंद्रे व त्यांचे सहकारी मोटारसायकल चोरांचा शोध घेत असताना एका हॉटेलनजीक नंबर प्लेटला चिखल लावलेल्या दोन मोटारसायकली आढळल्या. या मोटारसायकलीनजीक हे तिघेजण आढळून आले. त्यांच्याकडे एअरगन, कोयता, मिरची पूड सापडली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Three robbers caught in a scarf