शिक्षणाधिकाऱ्यांकडून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

By Admin | Updated: January 29, 2017 14:22 IST2017-01-29T14:22:53+5:302017-01-29T14:22:53+5:30

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक कडूस यांना धमकावून तीन लाखांच्या खंडणीची मागणी

Three officials arrested for cheating of education officials | शिक्षणाधिकाऱ्यांकडून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

शिक्षणाधिकाऱ्यांकडून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

 ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 29 -  जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक कडूस यांना धमकावून तीन लाखांच्या खंडणीची मागणी करून २५ हजार रुपये वसुल करणाऱ्या तिघा आरोपींना पोलीसांनी रविवारी अटक केली़ आरोपींमध्ये अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा राज्य कार्याध्यक्ष कृषिराज रुपचंद टकले याच्यासह धोंडीबा जबाजी शेटे, सुभाष गागरे व संतोष भगवान वायकर यांचा समावेश आहे़ पोलीसांनी टकले, गागरे व वायकर यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले आहे़
टकले व त्याच्या साथीदारांनी कडूस यांच्याकडून घेतलेल २५ हजार रुपये पोलीसांनी जप्त केले आहेत़ टकले व त्याच्या साथीदारांनी कडूस यांना प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवरून फोन करून तुमची कौटुंबिक माहिती माध्यमांमध्ये देऊन बदनामी करण्याची तसेच शिक्षण विभागाची बदनामी करण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची मागणी केली होती़ टकले याने कडूस यांच्याकडून २५ हजार रुपये वसुलही केले होते़ ३ ते २८ जानेवारी दरम्यान आरोपींनी टकले यांच्याशी पैशांसदर्भात संपर्क करून त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली होती़ याबाबत कडूस यांनी टकले, शेटे, गागरे व वायकर यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तिघा आरोपींना तातडीने अटक करत त्यांना न्यायाालयात हजर केले आहे़

Web Title: Three officials arrested for cheating of education officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.