दुपारी तीन वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात ४७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 16:06 IST2019-10-21T16:06:14+5:302019-10-21T16:06:48+5:30
विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते.

दुपारी तीन वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात ४७ टक्के मतदान
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते.
कोपरगाव ४७ टक्के, नेवासा ५७ टक्के, अकोले ४९, संगमनेर ५२, शिर्डी ४९, श्रीरामपूर ४२, शेवगाव ४५, राहुरी ४८, पारनेर ४८, अहमदनगर ३८, श्रीगोंदा ४४, कर्जत-जामखेड ५१ टक्के मतदान झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.