बिबट्याचे तीन पिल्ले आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 15:24 IST2017-08-23T15:23:51+5:302017-08-23T15:24:05+5:30
देवळाली प्रवरा येथील शेतकरी संजय जनार्दन मुसमाडे यांच्या शेतात बिबट्याचे तीन पिल्ले बुधवारी दुपारी आढळून आले़ संजय मुसमाडे व सौरभ मुसमाडे हे दोघे शेतामध्ये गिन्नी गवत कापत असताना बिबट्याचे पिल्ले आढळून आले़

बिबट्याचे तीन पिल्ले आढळली
द वळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील शेतकरी संजय जनार्दन मुसमाडे यांच्या शेतात बिबट्याचे तीन पिल्ले बुधवारी दुपारी आढळून आले़ संजय मुसमाडे व सौरभ मुसमाडे हे दोघे शेतामध्ये गिन्नी गवत कापत असताना बिबट्याचे पिल्ले आढळून आले़वन विभागाचे लक्ष्मण किनकमर यांनी देवळाली प्रवरा येथे जाऊन बिबट्याच्या पिल्लांची पाहणी केली़ सापडलेली तिन्ही पिल्ले मादी जातीचे आहेत़ पिल्ले लहान असल्याने त्यांना बिबट्याच्या स्वाधीन करण्यासाठी शेतात सोडून देण्यात आले आहे़ देवळाली बंगला येथे पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता़ देवळाली परिसरात मुसमाडे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर आहे़ वन खात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी संजय मुसमाडे यांनी केली आहे़