श्रीगोंद्यातील माध्यमिक शिक्षकांची कोविड सेंटरला तीन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:27+5:302021-06-03T04:16:27+5:30
श्रीगोंदा : माध्यमिकचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवकांकडून तालुक्यातील १६ कोविड सेंटरला २ लाख ८६ हजार रूपयांच्या रोख मदतीसह ग्रामीण ...

श्रीगोंद्यातील माध्यमिक शिक्षकांची कोविड सेंटरला तीन लाखांची मदत
श्रीगोंदा : माध्यमिकचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवकांकडून तालुक्यातील १६ कोविड सेंटरला २ लाख ८६ हजार रूपयांच्या रोख मदतीसह ग्रामीण रूग्णालयास ऑक्सिजन कॉन्स्टन्ट्रेटर भेट देण्यात आले.
श्री संत शेख महंमद महाराज श्रीगोंदा, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, पिंपळगाव पिसा, कोळगाव, घारगाव येथील कोविड सेंटरला प्रत्येकी १५ हजार रूपये, स्व. शिवाजीराव नागवडे कोविड सेंटरला २१ हजार,
लिंपणगाव, मढेवडगाव, पारगाव सुद्रिक, चांडगाव, आढळगाव, मांडवगण, वांगदरी, येळपणे प्रत्येकी ११ हजार मदत केली. ही मदत प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याकडे सुपूर्द केली.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक संघाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष विश्वनाथ शेलार, राजेंद्र खेडकर, हनुमंत रायकर, दिलीप काटे, शिवाजी गवळी, सुनील भोर, सचिन झगडे, दिलीप तुपे, शिक्षकेतर अण्णासाहेब चिखलठाणे, सतीश भालेराव, सचिन लगड, नवनाथ बोडखे, उद्धव गायकवाड, देवराम दरेकर, देविदास खेडकर, राम जंजिरे, एम. एस. लगड, आप्पासाहेब जगताप, रमजान हवालदार, हरिश्चंद्र नलगे, रमजान सय्यद, बी. टी. मखरे यांनी पुढाकार घेतला.
---
०२ श्रीगोंदा कोविड
श्रीगोंदा येथील ग्रामीण रूग्णालयास ऑक्सिजन कॉन्स्टन्ट्रेटर भेट देण्यात आले.