केरळमधील अपघातात नगरचे तीन ठार
By Admin | Updated: May 13, 2017 13:46 IST2017-05-13T13:46:30+5:302017-05-13T13:46:30+5:30
केरळमधून नगरकडे येत असताना एकाच कुटुंबातील तिघांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला़

केरळमधील अपघातात नगरचे तीन ठार
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १३ - केरळमधून नगरकडे येत असताना एकाच कुटुंबातील तिघांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला़ मुळचे केरळचे असलेले माँफेरो डिसुझा, त्यांची पत्नी व एक मुलगा अशा तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे़
डिसुझा कुटुंबिय गेल्या १७ वर्षांपासून नगरमधील सावेडीतील प्रोफेसर चौकात रोहित रोषण उडपी सेंटर या नावाने व्यवसाय करीत होते़ गेल्या आठ दिवसांपासून ते केरळला आपल्या घरी गेले होते़ तेथून नगरला येत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला़ या अपघाताची माहिती नगरमधील त्यांच्या मित्रांनी ‘लोकमत’ला सांगितली़