जबरी चोऱ्या करणाऱ्या तिघा सराईतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:42+5:302021-07-10T04:15:42+5:30
दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), किरण बापू घायमुक्ते (वय ३१, रा. दोघे देऊळगाव सिद्धी) व अमोल शहाजी गायकवाड (वय ...

जबरी चोऱ्या करणाऱ्या तिघा सराईतांना अटक
दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), किरण बापू घायमुक्ते (वय ३१, रा. दोघे देऊळगाव सिद्धी) व अमोल शहाजी गायकवाड (वय २६, रा. वडगावतांदळी, ता. नगर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या आरोपींविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात ७ तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून सोन्याचे दागिने व ८ इलेक्ट्रॉनिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक डी. आर. जारवाल, हेड कॉन्स्टेबल शैलेश सरोदे, लगड, पोलीस नाईक योगेश ठाणगे, बाळू कदम, संदीप जाधव, धर्मराज दहिफळे यांच्या पथकाने या आरोपींना जेरबंद केले.
................
फोटो ०९ पोलीस
ओळी- दागिने, वीजपंप चोरणाऱ्या आरोपींना नगर तालुका पोलिसांनी अटक केली.