शिंगवे तुकाई फाटा येथील अपघातात तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:21 IST2020-05-17T18:21:39+5:302020-05-17T18:21:49+5:30
घोडेगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शिंगवेतुकाई फाटा येथे रविवारी दुपारी तीन वाजता स्कार्पिओ व ईनोव्हा कारचा अपघात होऊन दोन चालक व एक प्रवासी जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

शिंगवे तुकाई फाटा येथील अपघातात तीन जखमी
घोडेगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शिंगवेतुकाई फाटा येथे रविवारी दुपारी तीन वाजता स्कार्पिओ व ईनोव्हा कारचा अपघात होऊन दोन चालक व एक प्रवासी जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
स्कार्पिओ (एम. एच. १६ बी. झेड. ७७०) ही नगरकडून शिंगवेतुकाई येथे जात होती. चालक त्यात एकटाच होता. महामार्गावरील शिंगवेतुकाई फाट्याकडे वळण घेत असताना औरंगाबादकडुन नगरकडे जाणारी ईनोव्हा कारने (एम. एच. १४-सी एक्स. २४८७) टँक्सीने जोरदार धडक दिली. ईनोव्हामध्ये चालकासह तीन प्रवासी होते. धडक बसताच स्कार्पिओमधील चालक पुढील काच फुटून बाहेर फेकला गेला. ईनोव्हामधील एक जण गंभीर जखमी झाला. अद्यापपर्यंत सोनई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नाही. अपघातस्थळी सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे पथकासमवेत पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णवाहिकेमधून नगरला उपचारासाठी हलविले.