नगर जामखेड रस्त्यावरील सारोळा बद्दीत अपघात : तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:14 IST2018-12-06T16:14:05+5:302018-12-06T16:14:09+5:30
नगर - जामखेड रस्त्यावर दुपारी सव्वा दोन वाजता सारोळा बद्दी येथील पुलाजवळ जामखेड कडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक

नगर जामखेड रस्त्यावरील सारोळा बद्दीत अपघात : तीन जखमी
चिचोंडी पाटील : नगर - जामखेड रस्त्यावर दुपारी सव्वा दोन वाजता सारोळा बद्दी येथील पुलाजवळ जामखेड कडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक ( एम एच 16, ए.इ. 7062 )व नगरकडे येणारी होंडासिटी कार ( एम.एच.- 16, ए. टी- 4377) च्या अपघातात जामखेडच्या प्रवीण राळेभात, त्यांची व सुमारे चार वर्षाची मुलगी असे तिघे जखमी झाले. त्यातवेळी नगर तालुका शिवसेनेचे नेते प्रवीण कोकाटे नगरला येत असतांना त्यांनी अपघातातील जखमीना मदत करत आपल्या गाडीतून खाजगी रूग्णालयात दाखल केले. अपघातात कारच्या उजव्याबाजुस टेम्पो घासल्याने राळेभात यांच्या डोक्याला मार लागला असून तातडीने उपचार मिळाल्याने धोका टळला आहे.
मध्यतंरी एका अपघातात वाहन पुलावरून खाली गेल्याने सुरक्षा कठडे तुटलेली आहेत. त्या मुळे अपघाच्या धोक्यामध्ये वाढ झाली असून सुरक्षेच्या दृष्टिने कठडे पुरवत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.