अपघातात तिघे जखमी
By Admin | Updated: May 17, 2017 17:04 IST2017-05-17T17:04:31+5:302017-05-17T17:04:31+5:30
अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़

अपघातात तिघे जखमी
आॅनलाईन लोकमत
चिचोंडी पाटील : नगर-जामखेड मार्गावरील चिचोंडी पाटील (ता़ नगर) शिवारात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एस़टी़ बस व कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
जामखेडकडून नगरकडे चाललेली एसटी बस (क्ऱएम़ एच़ १४, बी़ टी़ ३१५८) व नगर जामखेडकडे जाणारी विंडर कार (क्ऱएम़एच़ १४, डी़ए़ ९०४१) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली़ या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत़ जखमींमध्ये उत्तरेश्वर नागनाथ मुंडे, नितीन रामभाऊ अवचाळे, उत्तम रसाळ अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ कारमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्या असून, जखमी दारुच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़