आमदार लहामटे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दोन दिवस प्राथमिक आरोग्य व ग्रामीण रुग्णालयास भेटी दिल्या. अकोले तालुक्यातील तीनशेहून अधिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येत दोन हजार ते पाचशे रुपये मदत निधी जमा करायला सुरुवात केली. अवघ्या चार दिवसांत हा आकडा पाच लाखांच्या घरात आला आहे.
यातून अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्रांत जेवण, रक्त, ऑक्सिजन, प्लाज्मा आदींसाठी मदत केली जाणार आहे. यातून सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा काय असते याचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
.................
प्राथमिक शिक्षकांनी या संकट काळात जमेल तशी मदत करण्यासाठी तयारी सुरू केली. आवाहन केल्या दिवशीच सव्वा लाख रुपये जमा झाले. पाच लाख रुपये जमा करून लोकप्रतिनिधी व तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना उपचार व रुग्णांच्या जेवणासाठी खर्च केला जाणार आहे.
- सुनील बनोटे, शिक्षक नेते
..............
कोरोना संकट काळात जमेल तशी मदत करून शासन व गोरगरिबांना मदतीचा हात द्या. कोणत्याही साधारण कारणासाठी घराबाहेर पडू नका. वेळेत लसीकरण करून घ्या.
- मुकेश कांबळे, तहसीलदार