तीन दिवसांत पकडा दोनशे कुत्रे

By Admin | Updated: May 24, 2016 23:39 IST2016-05-24T23:33:07+5:302016-05-24T23:39:52+5:30

अहमदनगर: शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत़

Three hundred dogs to catch in three days | तीन दिवसांत पकडा दोनशे कुत्रे

तीन दिवसांत पकडा दोनशे कुत्रे

अहमदनगर: शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत़ उपायुक्त अजय चारठणकर यांनी मंगळवारी कोंडवाडा विभागाची कानउघाडणी केली असून, तीन दिवसांत ठेकेदाराकडून २०० मोकाट कुत्रे पकडून ते शहराबाहेर सोडण्याचे आदेश दिला आहे़
‘मोकाट कुत्र्यांमुळे तरुणाचा बळी’या ‘लोकमतम’धील मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ घेत आयुक्तांनी नागरिकांना होणारा मोकाट कुत्र्यांचा त्रास हा विषय भांगीर्याने घेतला आहे़
मुकुंदनगरमध्ये कुत्र्यामुळे अरबाज खान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्रे पकडण्याची पध्दत काय? ती पकडण्याची व्यवस्था काय यासह विविध प्रश्न उपस्थित करून स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून उत्तर मागविले आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी ‘मोकाट कुत्र्यामुळे तरुणाचा बळी’ वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल आयुक्तांनीही घेतली. मोकाट कुत्र्यांचा घोळका मागे लागल्याने मुकुंदनगरमधील अरबाज खान या तरुणाचा पळता पळता श्वास रोखून मृत्यू झाला. मंगळवारी हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर सभापती भोसले यांनी तातडीने आयुक्तांना पत्र दिले. शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याची व्यवस्था काय?, ते पकडण्याची पध्दत काय?,मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेका कोणत्या ठेकेदाराला दिला आहे. त्याच्या अटी, शर्ती काय? तीन महिन्यात ठेकेदाराने किती मोकाट कुत्री पकडली. त्याबदल्यात त्याला किती पैसे दिले? असे प्रश्न विचारत भोसले यांनी आयुक्तांकडे त्याचे उत्तर मागितले आहे. आयुक्त दिलीप गावडे यांनीही मोकाट कुत्र्यांचा प्रश्नावर कोंडवाडा, आरोग्य विभागाची बैठक घेतली. ठेकेदारामार्फत शहरातील मोकाट कुत्रे पकडून ती शहराबाहेर सोडण्याचे आदेश त्यांनी दिले. कोंडवाडा विभागाने हे काम ठेकेदाराकडून करून घेण्याची जबाबदारीदेखील निश्चित करून देण्यात आली.
शहरात मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलांना घराबाहेर सोडण्याचीही भीती महिलांमध्ये निर्माण झाली आहे. वृध्द तर कुत्र्याच्या भितीने रात्री घराबाहेर पडतच नाहीत. कुत्र्यांच्या झुंडीमुळे धडधाकट माणसालाही घाम फुटतो. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका दिला असला तरी ठेकेदाराची यंत्रणा कुचकामी ठरल्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three hundred dogs to catch in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.