संगमनेरच्या प्रणिता सोमणला तीन सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:26 IST2021-02-25T04:26:07+5:302021-02-25T04:26:07+5:30

कर्नाटक येथील गदग येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रणिता सोमण हिने सायकलींगच्या तीन प्रकाराच्या स्पर्धेत सहभाग घेतला नोंदवला होता. इलाईट ...

Three golds to Pranita Soman of Sangamner | संगमनेरच्या प्रणिता सोमणला तीन सुवर्ण

संगमनेरच्या प्रणिता सोमणला तीन सुवर्ण

कर्नाटक येथील गदग येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रणिता सोमण हिने सायकलींगच्या तीन प्रकाराच्या स्पर्धेत सहभाग घेतला नोंदवला होता. इलाईट टाइम ट्रायल ५१ मिनिट आणि १७ सेकंद, इलाईट मास स्टार्ट १ तास. आठ मिनिट आणि टिम रिले या विभागात तिने अतिशय कमी वेळात अंतर पार करुन यश संपादन करून सुवर्ण पदक पटकावतानाच भारतातील बेस्ट प्लेयरचा बहुमान मिळविला.

सायकलींग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी मनींदरपाल सिंग यांच्या हस्ते प्रणिताचा गौरव करण्यात आला. प्रणिता हिने अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले. प्रताप जाधव, संजय साठे आणि संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ५ ते ७ मार्च दरम्यान

मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय रोड स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Web Title: Three golds to Pranita Soman of Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.