नगरपालिकेच्या तीन कर्मचा-यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:58 IST2017-09-14T17:54:32+5:302017-09-14T17:58:52+5:30
उघड्यावर शौचास बसणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचा-यांना मारहाण झाल्याची घटना शहरातील हनुमान नगरमध्ये बुधवारी रात्री घडली. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

नगरपालिकेच्या तीन कर्मचा-यांना मारहाण
कोपरगाव : उघड्यावर शौचास बसणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचा-यांना मारहाण झाल्याची घटना शहरातील हनुमान नगरमध्ये बुधवारी रात्री घडली. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
भारत स्वच्छता अभियानांतर्गत उघड्यावर शौचास बसणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिकेने आर.एम.शिंगाडे, प्रशांत उपाध्ये, कैलास आढाव, गणी पठाण, रणजित डाके, संजय कसाब, मधुकर वाल्हेकर, विजय लोंढे, केशव राखपसारे व जयश्री घाटे या १० कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. त्यापैकी काही कर्मचारी बुधवारी रात्री हनुमाननगर भागात उघड्यावर बसणाºयांना शिट्ट्या वाजवून प्रतिबंध करीत होते. गिरमे वस्तीजवळ नितीन पवार यांच्यासह इतर काहींनी मुकादम गणी पठाण, संजय कसाब व रणजित डाके यांना मारहाण केली. त्यात कसाब यांचा हात तुटला. तर डाके यांना तोंड व छातीला जबर मार लागून ते जखमी झाले. या प्रकाराने पालिका कर्मचारी संतप्त झाले. संतप्त झालेल्या नगरपालिका कर्मचा-यांनी गुरुवारी दुपारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन पवार यांच्यासह मारहाण करणारांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मोर्चेक-यांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष सोपान शिंदे, आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल चव्हाण, राजू लोंढे, दशरथ राखपसारे, प्रल्हाद साबळे, विनोद डाके, आनंद वाल्हेकर, पवन हाडा, रणधीर तांबे, योगेश साळवे, बलराज चावरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.