तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: August 17, 2014 00:03 IST2014-08-16T23:37:48+5:302014-08-17T00:03:01+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात एका अधिकाऱ्याची नाशिकला, दुसरे नगरमध्ये एका विभागातून दुसऱ्या विभागात तर पुण्याहून एका अधिकाऱ्याची नगरला बदली झाली आहे.
सुमारे दीड वर्षापासून शिक्षणधिकारी प्राथमिक पदावरून बदलून आलेले दिलीप गोविंद यांची नाशिकला विभागीय उपशिक्षण सहाय्यक संचालनालय येथे सहाय्यक उपसंचालकपदी, त्यांच्या जागेवर पुण्याहून महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण केंद्रातून अशोक कडूस यांची शिक्षणाधिकारी प्राथमिकपदी बदली झाली आहे.
निरंतर शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी जिल्ह्यातच बदली झाली. बदलीचे आदेश शनिवारी राज्य सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झाले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी गोविंद दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आले होते. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभाग चांगलाच गाजला. यात आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा प्रश्न, बदली टाळण्यासाठी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशी पूर्ण झालेली होती. (प्रतिनिधी)