गणेशोत्सवात तीन ड्राय डे
By Admin | Updated: August 26, 2014 23:21 IST2014-08-26T23:12:40+5:302014-08-26T23:21:58+5:30
अहमदनगर: गणेश उत्सवानिमित्त जिल्हाभर तीन दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़

गणेशोत्सवात तीन ड्राय डे
अहमदनगर: गणेश उत्सवानिमित्त जिल्हाभर तीन दिवस देशी व विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मंगळवारी दिले आहेत़
गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात साजरा केला जाणार आहे़ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात शहरासह जिल्ह्यातील नागरिक सहभागी होत असतात़ उत्सव काळात काही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे़ या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, यासाठी शहरात गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी २९ आॅगस्ट रोजी दारू बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत़ तर शहरासह जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी दारु बंदी असणार आहे़ याशिवाय भिंगार येथील गणेश विसर्जनाच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी दारु बंदी असून, जिल्ह्यातील दारु विक्री वरील तीन दिवस बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़
(प्रतिनिधी)