तीन सराईत गुन्हेगारांंना अटक

By Admin | Updated: April 6, 2016 23:57 IST2016-04-06T23:50:46+5:302016-04-06T23:57:25+5:30

श्रीगोंदा : बेलवंडी पोलिसांच्या पथकाने गव्हाणेवाडी येथे सापळा रचून दोन गावठी कट्टे व चार जीवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या तिघांना जेरबंद केले.

Three civilians arrested | तीन सराईत गुन्हेगारांंना अटक

तीन सराईत गुन्हेगारांंना अटक

श्रीगोंदा : बेलवंडी पोलिसांच्या पथकाने गव्हाणेवाडी येथे सापळा रचून दोन गावठी कट्टे व चार जीवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या तिघांना जेरबंद केले. पकडलेले तिघेही राहता तालुक्यात रस्तालूट करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
बाळू सखाराम घाडगे, अजय गणेश चव्हाण, अक्षय भाऊसाहेब माकवणे (तिघेही रा. दुर्गापूर, ता. राहाता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना खबऱ्यामार्फत तिघेजण दुचाकीवरुन दोन गावठी कट्टे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वांगडे यांच्यासह त्यांच्या पथकाने साध्या वेशात सापळा रचला. सायंकाळी सातच्या सुमारास पुण्याहून नगरकडे दोन दुचाकीवर तिघे जात असल्याचे निदर्शनास येताच पथकाने त्यांना अडविले. पोलिसांना पाहताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक आबासाहेब झावरे, दादाराम म्हस्के, संभाजी शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Three civilians arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.