कोपरगावात मोकाट कुत्र्यांचा तीन बालकांवर हल्ला; बालक गंभीर जखमी
By रोहित टेके | Updated: March 15, 2023 17:18 IST2023-03-15T17:17:21+5:302023-03-15T17:18:26+5:30
शहरातील हनुमाननगर-संजयनगर परिसरात घराजवळ खेळणाऱ्या तीन बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असून ते गंभीर जखमी झाले आहे.

कोपरगावात मोकाट कुत्र्यांचा तीन बालकांवर हल्ला; बालक गंभीर जखमी
कोपरगाव : नगर परिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशातच बुधवारी (दि.१५) सकाळी शहरातील हनुमाननगर-संजयनगर परिसरात घराजवळ खेळणाऱ्या तीन बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असून ते गंभीर जखमी झाले आहे.
हसनेन इम्रान तांबोळी ( वय ६ ), हमजा जावेद अत्तार (वय ३ रा. आयेशा कॉलनी ) तर फैजल मोहसीन शेख, ( वय ४, रा. हनुमाननगर ) असे जखमी बालकांचे नाव आहे. त्यांच्यावर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यासह इतर जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे त्याचा तातडीने बंदोबस्त करावा. अशी मागणी संतप्त नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली आहे.