सोनई : सोनई (ता. नेवासा) येथील व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा जणांना अटक केली आहे.अटकेमध्ये श्यामकुमार शंकर खामकर, गणेश हरिभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांचा समावेश आहे. लेखापाल सोमाणी यांनी दोन महिन्यांपूर्वी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरुध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला.मुदतीनंतर पैशाची मागणी करुनही ते न मिळाल्याने ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन, उपोषण करुन वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला होता. ठेवीदारांचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी सुभाष लुणिया, अजित बडे यांनी केली आहे.
सोनई पतसंस्थेतील अपहार प्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:06 IST