दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक
By Admin | Updated: October 28, 2014 01:00 IST2014-10-28T00:17:46+5:302014-10-28T01:00:39+5:30
कोपरगाव : कोपरगाव-येवला रस्त्यावर मोटारसायकलवरून संशयास्पद पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले़

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक
कोपरगाव : कोपरगाव-येवला रस्त्यावर मोटारसायकलवरून संशयास्पद पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले़ या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़
घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार (दि़ २५) रोजी कोपरगाव पोलीस येवला रस्त्याने गस्त घालीत होते़ तेव्हा दोन मोटारसायकलवरून चौघे संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले़ पोलिसांची आपल्यावर नजर पडली, हे कळताच त्यांनी धूम ठोकली़ परंतु प्रभारी पोलीस निरीक्षक भोसले यांनी तातडीने आपल्या पथकासह पाठलाग करून जमाल अहमद जबी अहमद, मोहंमद रहेमान, हमीद अक्तर यांना अटक केली़ दोन आरोपी फरार झाले़ त्यातील बिलाल अहमद मुहंमद अजमल यास रविवारी अटक करण्यात आली़ एक आरोपी अद्यापही फरार आहे़ हे तीनही नाशिक कारागृहामध्ये होते़ ते बाहेर कसे आले, याची चौकशी कोपरगाव पोलीस करीत आहेत़
कोपरगाव तालुक्यात दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता़ पोलिसांनी त्यांच्या जवळून मोठा सुरा, चाकू, सत्तूर, लाकडी दांडके असे साहित्य जप्त केले आहे़ तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)