नेवासा येथे तिघांना मारहाण

By Admin | Updated: July 3, 2017 04:35 IST2017-07-03T04:35:01+5:302017-07-03T04:35:01+5:30

पूर्ववैमन्यस्यातून एकाने विरोधी गटातील तिघांना गावठ्ठी कट्टा दाखवित, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना

Threats to Three in Nevada | नेवासा येथे तिघांना मारहाण

नेवासा येथे तिघांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नेवासा फाटा (जि. अहमदनगर) : पूर्ववैमन्यस्यातून एकाने विरोधी गटातील तिघांना गावठ्ठी कट्टा दाखवित, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना नेवासा फाटा येथे शनिवारी सायंकाळी घडली. राहुल धनवटे, ज्ञानेश्वर दहातोंडे, विशाल आळकुटे अशी यातील जखमींची नावे असून राहुलची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी रवि भालेराव, पप्पू इंगळे, दत्तू काळे, विकी कांबळे, पप्पू सोनकांबळे, निखिल चंदाणी, रवि शेरे, सतीश चक्रनारायण, बबलू साळवे, शिवा साठे ( सर्व रा. नेवासा फाटा) व अन्य ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Threats to Three in Nevada